Posts

जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य

 [ जागतिक जैवविविधता दिवस २०२१- विशेष लेख] °° जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य °° "जैवविविधतेचे संवर्धन केल्या शिवाय शाश्वत विकास शक्यच नाही, असे अभ्यासकांनी किती वेळाही अधोरेखित केले तरी विकासाच्या मागे धावणाऱ्या माणसाला आपल्या सभोवताली असलेली जीवसृष्टी आणि वनसंपदेचा विसर पडलाय. त्यामुळे या जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली".      २२ मे हा दिवस 'जागतिक जैवविविधता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जैवविविधतेच्या विषयावरील ज्ञान आणि जागरूकता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जैविक विविधतेसाठी 22 मे आंतरराष्ट्रीय दिन जाहीर केला.  जैवविविधता दिन 2021 'निसर्गसाठी आम्ही समाधानाचे भाग आहोत' या थीमअंतर्गत साजरा केला जात आहे. सन १९९३ पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने २२ मे हा दिवस साजरा केला जातो

पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही!

  पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही ! भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच काय तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील निसर्गाचा सहभाग आढळून येतो. पण एकीकडे हळूहळू आपण आधुनिकीकरण आत्मसात करतोय आणि निसर्ग आपल्या जीवनातून आणि संस्कृतीमधून हळूहळू दूर होत चालला आहे आणि दुसऱ्या संस्कुती त्याला आपलंस करत आहेत. आपल्या संस्कृतीची ओळख असणाऱ्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये सामावून घेतल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पत्रावळी! ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ असे म्हणत विवाह, गृहप्रवेश, भंडारे इत्यादी धार्मिक कार्यक्रमात ग्रामिण भागात पळस, कुडा, मोह झाडांच्या पानांच्या  पत्रावळी असायच्या. दोन तीन दशकांपूर्वी  पानाच्या पत्रावळीची जागा घेतली. दैनंदिन जीवनातील बदलामुळे शहरात पानाच्या पत्रावळीची  जागा आता स्टील, प्लास्टिक, थर्माकोलच्या ताटयानी घेतली आहे.  थर्माकॉल व प्लॅस्टीकच्या पत्रावळींनी घेतल्यानंतर मार्च २०१८ गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टीक व थर्माकॉलवर शासनाने बंदी घातल्यानंतर पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पत्रांवळीवर जेवनावळी ग्रामि

बहरला बहावा, यावर्षी चांगले पाऊस पडण्याची शक्यता!

  बहरला बहावा, यावर्षी चांगले पाऊस पडण्याची शक्यता! चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. करंज, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरते; ते झाड म्हणजे ‘बहावा’. हा १००% भारतीय कुळातील असून भारताच्या विविध भागात आढळते पिवळ्याधम्मक फुलांच्या पाकळ्यानी भरलेले बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखच. मराठीत 'बहावा ' तर शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले.  फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात.वर्णन बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. बहुगुणी बाहवा एक वनौषधी म्हणून उपयोगात आणला जातो. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'गोल्डन शोवर ट्री' म्हणून ओळखला जातो.  पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुन

बदलत्या काळाच्या ओघात गावरान आंबे दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत

  बदलत्या काळाच्या ओघात गावरान आंबे दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत उन्हाळा आला की आठवण होते ती आंब्याची! हा आंबा म्हणजे आजच्या मार्केटिंगच्या युगातील एक्सपोर्ट केलेला आंबा नव्हे तर गावरान आंब्याची. मात्र हा गावरान आंबा आज हद्दपार झाल्याचे चित्र असून, रसाळीही दुर्मीळ झाली आहे. पूर्वी उन्हाळ्यात पाहुण्यासाठी खास आंब्याच्या रसाचा पाहुणचार व्हायचा, सकाळी न्याहारीसाठी आंबा, दुपारच्या जेवणाबरोबरही आंबा असायचा. त्याला कारणही तसेच होते. प्रत्येकाच्या शेतात एकतरी आंब्याचे झाड असायचे तर प्रत्येक गावात चारासह आमराई (एकाच शेतात आंब्याची अनेक झाडे ) असायच्या. या आमराईमुळे गावात घराघरांत आंबे असायचे.  पूर्वी "दादा लगाए आम और खाये पोता" म्हणीप्रमाणे प्रत्येक गावागावात नामांकित गावरान आमराया अस्तित्वात होत्या. ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतमजुरांची घरेसुद्धा आंब्यांनी भरलेली असायची. वेगवेगळ्या चवीच्या या रसभरित आंब्यामुळे ग्रामीण भागात चंगळ असायची. पाहुण्यांसाठी हमखास आमरस असायचा. नववधू किंवा नवीन जावई बापूंना आंब्याचा रस, कांद्याची भाजी व घरी तयार केलेल्या खारुडी, कुरडईचा पाहुणचार म्हणजे

जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व

जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व वसंत ऋतूची चाहूल लागताच पक्ष्यांचा हंगाम सुरू होत असतो. स्थलांतरित पक्षापासून ते निवासी पक्षाच्या जगात आनंदोत्सवाला सुरुवात होते जगात भलेही तुम्ही कुठेही राहत असाल, घनदाट जंगलापासून ते वाळवंट किंवा एखाद्या शहरात. सकाळी तुम्ही पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे होत असाल. मग तो कावळा असो की कोकीळ, पक्षी देशात प्रत्येक ठिकाणी आढळतील. जगातील मोजक्याच देशांत आपल्या देशासारखी पक्ष्यांची संख्या असेल. पक्षी निरीक्षकांनी आतापर्यंत ८६७ प्रजाती पाहिल्याचा उल्लेख केला आहे. त्यात स्थानिक आणि प्रवासीही पक्षी आहे. पृथ्वीवरचा माणूस जेव्हा प्रगत नव्हता तेव्हा ‘जीवो जीवस्य जीवनम’ ह्या न्यायाने त्याने पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आनंदाने जीवन जगत असे. पण आता ही परिस्थिती राहिली नाहीच. मानवाने स्वतःच्या प्रगतीचे नावावर जागतिक विध्वंसाला केव्हाच सुरुवात केली आहे. यात हानी निसर्गाची आणि दुष्परिणाम मानवालाच भोगावं लागत आहे. पक्षी आपल्या संस्कृतीत पक्ष्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देवी-देवतांचे वाहनही पक्षी आहेत आणि राजघराण्याच्या प्रतीकांतही पक्ष्यांचे चिन्ह ह