जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व


जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व

वसंत ऋतूची चाहूल लागताच पक्ष्यांचा हंगाम सुरू होत असतो. स्थलांतरित पक्षापासून ते निवासी पक्षाच्या जगात आनंदोत्सवाला सुरुवात होते जगात भलेही तुम्ही कुठेही राहत असाल, घनदाट जंगलापासून ते वाळवंट किंवा एखाद्या शहरात. सकाळी तुम्ही पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे होत असाल. मग तो कावळा असो की कोकीळ, पक्षी देशात प्रत्येक ठिकाणी आढळतील. जगातील मोजक्याच देशांत आपल्या देशासारखी पक्ष्यांची संख्या असेल. पक्षी निरीक्षकांनी आतापर्यंत ८६७ प्रजाती पाहिल्याचा उल्लेख केला आहे. त्यात स्थानिक आणि प्रवासीही पक्षी आहे.

पृथ्वीवरचा माणूस जेव्हा प्रगत नव्हता तेव्हा ‘जीवो जीवस्य जीवनम’ ह्या न्यायाने त्याने पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आनंदाने जीवन जगत असे. पण आता ही परिस्थिती राहिली नाहीच. मानवाने स्वतःच्या प्रगतीचे नावावर जागतिक विध्वंसाला केव्हाच सुरुवात केली आहे. यात हानी निसर्गाची आणि दुष्परिणाम मानवालाच भोगावं लागत आहे.

पक्षी आपल्या संस्कृतीत पक्ष्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देवी-देवतांचे वाहनही पक्षी आहेत आणि राजघराण्याच्या प्रतीकांतही पक्ष्यांचे चिन्ह होते. संगीत असो की कला, प्रत्येक ठिकाणी पक्षी आहेत. भारतातील अनेक पुराण कथांमध्ये पक्षी आहेत. आपल्याकडे ३००० वर्षांपूर्वीच्या यजुर्वेदात आशियाई कोकिळेचा उल्लेख आहे. पक्षी आपले सहकारी आहेत, शारीरिकदृष्ट्याही आणि सांस्कृतिकदृष्ट्याही.

आजची परिस्थिती लक्षात घेता जागतिक विध्वंसाची सुरुवात होऊन आता आपण केवळ बोनस वेळेवर जगत आहोत जगत आहोत. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की इथं कधी काय होईल हेच सांगता येत नाही. म्हणजे अनियमित जीवनपद्धतीच !

सन २०२० चा विचार केला तर आपण काही महिन्यांपासून स्वतःच्या घरामधे स्वतःची जीव वाचवण्यासाठी बंदिस्त आहोत. कोरोना विषाणू पसरवण्यासाठी वटवाघूळ पक्ष्यांना दोष दिल्या जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे चीन, अमेरिका यासारख्या मोठ्या बलाढ्य राष्ट्रांना आपण प्रगत राष्ट्र संबोधतो. पण ह्या दोन राष्ट्र मध्ये सर्वात जास्त पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. जगातील प्रदूषण पैकी चीन आणि अमेरिका मिळून ४०% प्रदूषण या दोन राष्ट्रात होतो. झाडांची संख्या कमी झाली, विकासाच्या नावाखाली सर्व जंगले नष्ट केली. त्यामुळे पक्षांनी राहायचे कुठे? मग ते गावाकडे शहरांकडे येणारच ना! ही एक गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण शेवटी कोरोना संक्रमणाला दोषाचे खापर वटवाघुळ पक्षाच्या डोक्यावरच फोडण्यात आले.

इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा-जेव्हा मानवाला अशा महामारीचा सामना करावा लागला तेव्हा-तेव्हा मानवाला स्वतःची चूक लक्षात येत गेली. ही गोष्ट सन १९५८ ची आहे. चीनचा पंतप्रधान माओ झेडोंग यांनी चिमण्यांना जिवे मारण्याचा आदेश दिला होता. माओ झेदोंगने मोहीम सुरू केली तेव्हा त्याला 'चार कीटक मोहीम' असे नाव देण्यात आले. या मोहिमेअंतर्गत चार पेस्ट मारण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिला होता डास, दुसरा माशी, तिसरा उंदीर आणि चौथा म्हणजे आमची लाडकी निर्दोष चिमणी. त्या निर्दोष चिमण्यांना मारण्याचा विचार चिनी लोकांच्या डोक्यात आला कसा याचा विचारही करणे विचित्रच! असे मानले जाते की डासांमुळे मलेरिया पसरतो, माश्यांमुळे कॉलरा असतो आणि उंदरांना प्लेग होतो, पण चिमण्याचा दोष काय होता? 

माओ झेडोंग यांच्या आदेशानुसार निष्पाप चिमण्याला ठार मारण्यास सांगण्यात आले होते. त्यांना वाटत होते की चिमण्या लोकांचे धान्य खातात आणि शेतकऱ्यांची मेहनत वाया घालवतात. डास, माशी आणि उंदीर हानी पोचवतात, परंतु चिमण्यासारखे निष्पाप पक्षी माणसांच्या अगदी जवळ राहायचे, त्यांना हवे असले तरीही ते लपू शकले नाहीत. पण चीनमधील लोकांनी चिमण्यांना निर्दयपणे शोधून त्यांना ठार मारले.

त्यावेळी चीनमधील साऱ्या जनतेने, एनजीओ, क्रांतिकारकांनी ही मोहीम एका चळवळीसारखी लोकांमध्ये पसरविली. लोक भांडी, ढोलक, ड्रम वाजवून पक्ष्यांना उडवायचे. लोकांचा प्रयत्न असा होता की चिमण्या कोणत्याही स्थितीत बसू नये आणि उडता कामा नये. मग काय होतं, अशा परिस्थितीत उडतांना ती इतकी दमून गेली की ती आकाशातून पडेल आणि जमिनीवर मरेल. कुठलीही चिमणी जिवंत राहणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांच्या घरट्यांचा शोध घेतला गेला आणि तोडण्यात आला, ज्यामध्ये अंडी होती आणि त्यांना घरट्यात पक्षी आढळल्यास माणसांनी त्यांना ठार मारले.

एखादी व्यक्ती ज्याने चिमण्याला मारले तितके मोठे प्रतिफळ. ज्यानी चिमण्याला ठार मारले त्यांना शाळा-महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये पदके मिळाली. जितके जास्त चिमण्या मारले गेले, तितके जास्त टाळ्यांचा पुरस्कार झाला. साहजिकच ही मोहीम अशा प्रकारे लोकांमध्ये पसरली गेली की लोकांमध्ये चिमण्याला ठार मारण्यात अजिबात संकोच वाटला नाही.

चिमण्यांच्या लपण्यासाठी कोणती जागा सर्वात सुरक्षित आहे हे चिमण्याला लवकरच समजले. बर्‍याच चिमण्यांनी कळप तयार केले आणि ते पेकिंगमधील पोलंडच्या दूतावासात गेले. चिमण्याला ठार मारण्यासाठी दूतावासात जायला निघालेले अधिकारी बाहेरच थांबले. परंतु मानव मानव आहेत, विशेषत: चीनच्या त्या लोकांच्या डोक्यावर रक्त आहे. संपूर्ण पोलिश दूतावास सर्व बाजूंनी वेढलेले होते. दोन दिवस ड्रम बीट सुरू ठेवला. ढोल-ताशांच्या गोंगाटाने अखेर चिमण्यांचा कळप मरण पावला. स्वच्छता कामगारांच्या सफाई कामगारांनी मरण पावलेल्या प्रिय चिमण्याला दूतावासातून बाहेर फेकण्यात आले.

चीनमध्ये एका मोहिमेमध्ये चिमण्याला ठार मारण्याचे पाप लोकांनी केले होते. परंतु केवळ दोन वर्षात एप्रिल १९६० पर्यंत लोकांना त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागले. परिणामी दोन वर्षानंतर सन १९६० मध्ये भात पिकामध्ये वाढ होण्याऐवजी कमी होऊ लागली. कोणत्याही पिकाचे उत्पादन होत नव्हते. जिकडे पाहावे तिकडे किटकाची संख्खेत भयंकर वाढ झाल्यामुळे कोणतेही शेतीच उत्पादन होत नव्हते. आता चिनी भयंकर चूक केल्याचे माओच्या लक्षात आले होते. त्याने लगेचच चिमण्यांना चार कीटकांपासून माघार घेण्याचे आदेश जारी केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. टोळ व इतर कीटकांची संख्या वेगाने वाढली. चिमण्या आधीच मारल्या गेल्या आहेत, जे त्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवतील. कीटकांचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरली जात होती, परंतु उत्पादन वाढण्याऐवजी कमी होत जात. आणि नंतर याने दुष्काळाचे रूप धारण केले, ज्यामध्ये सुमारे २५ दशलक्ष लोक उपाशी राहिले. माओ झेडोंग यांना त्यांची चूक ओळखण्यास बराच उशीर झाला होता, परंतु आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्या किती महत्त्वाची आहे हे आम्हाला ठाऊक आहे. 

चिमण्याअभावी किती नुकसान होऊ शकते याचा चीनचा दुष्काळ याचा थेट पुरावा आहे. चिमण्याला मारु नका. हा पक्षी मानवाच्या अगदी जवळ राहतो आणि विचार करा, चिमणी किती अन्न खाईल. आज शहरांमध्ये चिमण्या एखादाच दिसतात. म्हणून आपल्या गच्चीवर चिमण्यासाठी थोड पाणी आणि मुठभर धान्य ठेवलं तर आपल अस खूप काही कमी होणार का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा जेणेकरून आम्हाला चीनसारख्या दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.

खरं तर, चिमण्या केवळ धान्यच खात नाहीत, सामान्यपणे वनस्पतींसाठी, विशेषतः शेतातील पिकांसाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणार्‍या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. त्यामुळे अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकांनाच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक पक्ष्यांकडून खाल्ले जातात. त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते. दरवर्षी हिवाळ्यामध्ये कीटकांची एक नवी पिढी तयार होत असते. पिकांना घातक ठरणार्‍या कीटकांच्या टोळ्या आणि अळ्या खाऊन किडींपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात.

विकास बावनकुळे, पक्षी प्रेमी,

जि. भंडारा.

८४१२९७१०४८


Article published in 

Lokmat Hello bhandara,

Dainik Bhandara Express,

Bhandara Patrika





Comments

Popular posts from this blog

बहरला बहावा, यावर्षी चांगले पाऊस पडण्याची शक्यता!

पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही!

बदलत्या काळाच्या ओघात गावरान आंबे दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत