पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही!

  पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही !

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच काय तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील निसर्गाचा सहभाग आढळून येतो. पण एकीकडे हळूहळू आपण आधुनिकीकरण आत्मसात करतोय आणि निसर्ग आपल्या जीवनातून आणि संस्कृतीमधून हळूहळू दूर होत चालला आहे आणि दुसऱ्या संस्कुती त्याला आपलंस करत आहेत. आपल्या संस्कृतीची ओळख असणाऱ्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये सामावून घेतल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पत्रावळी!

‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ असे म्हणत विवाह, गृहप्रवेश, भंडारे इत्यादी धार्मिक कार्यक्रमात ग्रामिण भागात पळस, कुडा, मोह झाडांच्या पानांच्या  पत्रावळी असायच्या. दोन तीन दशकांपूर्वी  पानाच्या पत्रावळीची जागा घेतली. दैनंदिन जीवनातील बदलामुळे शहरात पानाच्या पत्रावळीची  जागा आता स्टील, प्लास्टिक, थर्माकोलच्या ताटयानी घेतली आहे. 

थर्माकॉल व प्लॅस्टीकच्या पत्रावळींनी घेतल्यानंतर मार्च २०१८ गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टीक व थर्माकॉलवर शासनाने बंदी घातल्यानंतर पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पत्रांवळीवर जेवनावळी ग्रामिण भागात सुरु असून अशा पारंपरिक पत्रवाळींचा व्यवसायास नवसंजीवनी मिळणार असे संकेत दिसले; परंतु अद्यापही असे झाले नाही.

सध्या समारंभात कागदी आणि थर्माकोल पासून तयार केलेल्या पत्रावळीवर जास्त भर दिला जातो. याशिवाय कागदी पत्रावळीना एका बाजूने मेणाचा थर दिला जातो. असाल तर दिलेल्या पत्र आणि आरोग्यासाठी घातक असतात. त्यामूळे मानवाला विवीध आजराचा सामना करावा लागतो. याचे परिणाम एकावेळी दिसले नसले तरी ते मानवासाठी खूप घातक ठरते. याउलट पत्रावळी आरोग्यासाठी  चांगली असल्याचे आयुर्वेद ग्वाही देते. ही हजारों वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या किंवा बांबूच्या काळीचा उपयोग केला जातो. याशिवाय पळसाच्या पानांना लागत नाही. कुडा, मोह, घोघुर्ली झाडांच्या पानांच्या पत्रावळी बनवतात.

या पत्रावळीत केलेले जेवण लोकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे.  हिंदू संस्कतीनुसार घरी कोणताही एखादा सण  पत्रावली शिवाय साजरा होत नसे; मात्र परिस्थीती आता पुर्ण बदलून गेली मंदिरातील प्रसाद ही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या प्लेट मध्ये मिळते.

पत्रावळीमधील जेवण पचनास मदत होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत यंत्राद्वारे प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण बनवल्या जावू लागल्या. किंमतीने कमी आणि वापरण्यास सोपी असलेली प्लॅस्टिक पत्रावळी सहज उपलब्ध होऊ लागली. विविध रंगांत आकर्षक दिसणाऱ्या या पत्रावली प्लॅस्टिक बरोबर थर्माकाॉल व कागदी स्वरुपातही उपलब्ध होवू लागल्याने, त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे पारंपारीक पत्रावळी बनवून आपला प्रपंच चालविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने काहींना इतर व्यवसायांकडे वळावे लागले तर काहींनी प्लॅस्टीक पत्रावलीच्या व्यवसायात उतरणे अपरिहार्य झाले. त्यामुळे अविघटनशील अशा प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने प्रदूषणाची समस्याही वाढली. 

खेड्यात लोक उन्हाळयाच्या दिवसात शेतीची कामे नसल्याने घर बसल्या पळसाच्या, मोहाच्या पानांपासून पत्रावळी बनविण्याचा लघू उद्योग चालवित होते. ग्रामीण भागातील पाने गाेळा करणाऱ्या आदिवासी बांधवांना पत्रावळी हे व्यवसायिक दृष्या आर्थिक मदत करणारे असून सध्या काळाची गरज बनली आहे परंतु अद्यापही शासनाकडून अशा लघुउद्योगांना कोणत्याही प्रोत्साहन दिला जात नाही.    

आपण सर्व भारतीयांनी देखील प्रेरणा घेऊन धरणी मातेसाठी धोका उत्पन्न करणाऱ्या प्लास्टिकला आपल्या जीवनातून दूर सारण्याचे प्रण घेणे गरजेचे आहे. यासाठी एखाद्या सामाजिक चळवळीची गरज नाही, प्रत्येकाने स्वत:हून या गोष्टीला सुरुवात केली तर पूर्वीसारखे पत्रावळी आणि द्रोणांचे दिवस यायला जास्त वेळ लागणार नाही.

"निसर्ग हा आपल्याला भरभरून देतो, त्याचा आपण कसा वापर करून घेतो हे मानवावर अवलंबून असते. या पत्रावळ्या आणि द्रोण रोजच्या जीवनामध्ये वापरल्या तर कचरा आणि प्लास्टिकच्या प्रदूषणाला बऱ्यापैकी आळा बसेल. या मुळे अनेक लोकांना रोजगार मिळेल. तसेच वापरून झालेल्या पत्रवलीं चा विल्हेवाट लावताना त्यापासून खत बनवले तर जमीन देखील सुपीक होईल, शिवाय कोणताही प्रदुषण होणारं नाही"


विकास बावनकुळे, 

युवा पर्यावरण कार्यकर्ता ८४१२९७१०४८

vikasbawankule6@gmail.com


Published in 

1) Lokmat Hello Bhandara

2) Naurastra Bhandara

3 )Dainik Bhandara Express

4) Bhandara Patrika

Comments

Popular posts from this blog

जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य

जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व

बहरला बहावा, यावर्षी चांगले पाऊस पडण्याची शक्यता!