Posts

Showing posts from May, 2021

जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य

 [ जागतिक जैवविविधता दिवस २०२१- विशेष लेख] °° जैवविविधतेच्या संवर्धनाने शाश्वत विकास शक्य °° "जैवविविधतेचे संवर्धन केल्या शिवाय शाश्वत विकास शक्यच नाही, असे अभ्यासकांनी किती वेळाही अधोरेखित केले तरी विकासाच्या मागे धावणाऱ्या माणसाला आपल्या सभोवताली असलेली जीवसृष्टी आणि वनसंपदेचा विसर पडलाय. त्यामुळे या जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली".      २२ मे हा दिवस 'जागतिक जैवविविधता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जैवविविधतेच्या विषयावरील ज्ञान आणि जागरूकता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जैविक विविधतेसाठी 22 मे आंतरराष्ट्रीय दिन जाहीर केला.  जैवविविधता दिन 2021 'निसर्गसाठी आम्ही समाधानाचे भाग आहोत' या थीमअंतर्गत साजरा केला जात आहे. सन १९९३ पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने २२ मे हा दिवस साजरा केला जातो...

पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही!

  पानाच्या पत्रावळ्या; वापर कमी झाला असला तरी महत्व कमी नाही ! भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच काय तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील निसर्गाचा सहभाग आढळून येतो. पण एकीकडे हळूहळू आपण आधुनिकीकरण आत्मसात करतोय आणि निसर्ग आपल्या जीवनातून आणि संस्कृतीमधून हळूहळू दूर होत चालला आहे आणि दुसऱ्या संस्कुती त्याला आपलंस करत आहेत. आपल्या संस्कृतीची ओळख असणाऱ्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये सामावून घेतल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पत्रावळी! ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ असे म्हणत विवाह, गृहप्रवेश, भंडारे इत्यादी धार्मिक कार्यक्रमात ग्रामिण भागात पळस, कुडा, मोह झाडांच्या पानांच्या  पत्रावळी असायच्या. दोन तीन दशकांपूर्वी  पानाच्या पत्रावळीची जागा घेतली. दैनंदिन जीवनातील बदलामुळे शहरात पानाच्या पत्रावळीची  जागा आता स्टील, प्लास्टिक, थर्माकोलच्या ताटयानी घेतली आहे.  थर्माकॉल व प्लॅस्टीकच्या पत्रावळींनी घेतल्यानंतर मार्च २०१८ गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टीक व थर्माकॉलवर शासनाने बंदी घातल्यानंतर पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पत्...