Posts

Showing posts from May, 2020

जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व

जागतिक विध्वंसाच्या उंबरठ्यावरून पक्ष्यांचे महत्त्व वसंत ऋतूची चाहूल लागताच पक्ष्यांचा हंगाम सुरू होत असतो. स्थलांतरित पक्षापासून ते निवासी पक्षाच्या जगात आनंदोत्सवाला सुरुवात होते जगात भलेही तुम्ही कुठेही राहत असाल, घनदाट जंगलापासून ते वाळवंट किंवा एखाद्या शहरात. सकाळी तुम्ही पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे होत असाल. मग तो कावळा असो की कोकीळ, पक्षी देशात प्रत्येक ठिकाणी आढळतील. जगातील मोजक्याच देशांत आपल्या देशासारखी पक्ष्यांची संख्या असेल. पक्षी निरीक्षकांनी आतापर्यंत ८६७ प्रजाती पाहिल्याचा उल्लेख केला आहे. त्यात स्थानिक आणि प्रवासीही पक्षी आहे. पृथ्वीवरचा माणूस जेव्हा प्रगत नव्हता तेव्हा ‘जीवो जीवस्य जीवनम’ ह्या न्यायाने त्याने पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आनंदाने जीवन जगत असे. पण आता ही परिस्थिती राहिली नाहीच. मानवाने स्वतःच्या प्रगतीचे नावावर जागतिक विध्वंसाला केव्हाच सुरुवात केली आहे. यात हानी निसर्गाची आणि दुष्परिणाम मानवालाच भोगावं लागत आहे. पक्षी आपल्या संस्कृतीत पक्ष्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देवी-देवतांचे वाहनही पक्षी आहेत आणि राजघराण्याच्या प्रतीकांतही पक्ष्यांचे चिन्ह ह...