बहरला बहावा, यावर्षी चांगले पाऊस पडण्याची शक्यता!
बहरला बहावा, यावर्षी चांगले पाऊस पडण्याची शक्यता! चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. करंज, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरते; ते झाड म्हणजे ‘बहावा’. हा १००% भारतीय कुळातील असून भारताच्या विविध भागात आढळते पिवळ्याधम्मक फुलांच्या पाकळ्यानी भरलेले बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखच. मराठीत 'बहावा ' तर शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात.वर्णन बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. बहुगुणी बाहवा एक वनौषधी म्हणून उपयोगात आणला जातो. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'गोल्डन शोवर ट्री' म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुन...